Breaking
ई-पेपरकवितादादरा नगर हवेलीनागपूरविदर्भसाहित्यगंध

बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 8 4

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट नऊ🎗🎗🎗*

*🥀विषय : गाव तसं चांगलं🥀*
*🍂बुधवार : १८/ फेब्रुवारी /२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*गाव तसं चांगलं*

गाव तसं चांगलं होतं
गुण्यागोविंदानं नांदणारं
सुखासमाधानानं जगणारं
आणिक एकोप्यानं वागणारं.. //

मानमर्यादा जपणारं
देवा धर्माला मानणारं
भजन किर्तनात रमणारं
शेतीवाडीत पंढरी पाहणारं.. //

सदा सत्य बोलणारं
आदर्शावरती चालणारं
स्त्रीत्वाचा सन्मान करणारं
नितिमत्तेत स्वतःला तोलणारं.//

गाव तसं चांगलं
बाधलं राजकारण
बिघडलं समाजकारण
अन् माजलं वाद अकारण.. //

सरला सुसंवाद
जेथे तेथे वादविवाद
कुणी कुणाला देईना दाद
देवापेक्षा जास्त नेत्यांचा नाद..//

साम,दाम, दंड,भेद
एकीत पडला उभा छेद
डाव प्रतिडाव घेती वर्मवेध
मात्र नसेच कुणाला खंत खेद.//

कांही उरेना चांगलं
खोबरं तिकडं चांगभलं
इमान गहाण सत्व भंगलं
गावाचं गावपण वेशीला टांगलं.//

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🔰🌀➿➿➿➿
*गाव तसं चांगलं*

कितीही गरिबीने गांजलं
भ्रष्टाचारात सबंध भंगलं..
चिरीमिरीचे वाढले प्रस्थ
तरी म्हणा गाव तसं चांगलं..

वीज, पाणी मुबलक त्यांना
श्रीमंतांनी फक्त मज्जा करावी..
अंधारात चाचपडणाऱ्याने फक्त
काय भलीमोठी वीज बिले भरावी..

गाव तसं चांगलं म्हणणाऱ्यांपुढे
कशी मांडावी लोकशाहीची गाऱ्हाणी..
एकाच माळेचेच सगळे मणी
किती चांगले तरी मुरते कुठेतरी पाणी…

गाव तसं चांगलं होतं पण
पणालाच तर लागली कीड सारी..
एकेकाळीचे समृद्ध, सुंदर प्रदेश
आज कुरूप,अस्वस्थ अन् लाचारी..

गाव चांगले अन् समृद्ध होण्यासाठी
बदलले पाहिजे विचार नि राजकारण…
सामान्य जनतेच्या हितासाठी फक्त
निःस्वार्थपणे राबवावे विकासाचे धोरण…

*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🔰🌀➿➿➿➿
*गाव तसं चांगलं…!*

काय वर्णू महती माझ्या ईवल्याशा गावाची,
‘गाव तसं चांगलं’ हीच ख्याती झाली त्याची

निसर्गसौंदर्याचा अनमोल ठेवा लाभला खास,
स्वच्छतेचा संदेश देई घरा-घरांत सुवास

प्रत्येक घरापुढे उभे तुळशीचे पवित्र वृंदावन,
सांजवेळी दिवा लावुनी सवाष्णी जपती मांगल्यपण.

संस्कारांचा तेजोदीप उजळतो मनामनात,
लहान-थोरांच्या वर्तनातून दिसे तो प्रत्येक क्षणात.

‘अतिथी देवो भव’ ही भावना राबते घराघरांत,
माणुसकीचा अखंड झरा वाहे प्रत्येक हृदयांत.

आपुलकी, आदर, प्रेम यांचा साज येथे नितांत,
म्हणूनच शासन-दरबारीही झाली दखल त्याची अभिमानांत.

असा माझा गाव… चांगुलपणाचा मानकरी ठरला,
‘गाव तसं चांगलं’ म्हणून पुरस्काराने सन्मानित झाला.

*सौ अनिता व्यवहारे*
*ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर*
*सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🔰🌀➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*गाव तसं चांगलं*

होतं गाव तसं चांगलं
आपुलकीनं वागणारं
शेजारधर्म पाळणारं
गुण्यागोविंदानं राहणारं

नात्यांची होती घट्ट वीण
आपसात ऊब मायेची
पारावर गप्पा हो रंगत
साऱ्यांवर सावली सुखाची

अचानक आक्रित घडलं
गाव शहराला हो भिडलं
शहराचं वारं आता हो
गावाला कि हो लागलं

पारावरच्या गप्पा साऱ्या
आता नाहीच हो रंगत
ज्यानं त्यानं धरली हो
आता मोबाईलची संगत

जगाशी नाती जोडली
मनातली आपुलकी संपली
संवेदना हरवून गेलेली
माणसांची यंत्र हो उरली

सेलिब्रेटी कलाकारांच्या
घरात सारेजण पोचले
शेजारच्या आप्तेष्टांचे
सोयरसुतक न उरले

भाजी भाकरीची जागा
पिझ्झा बर्गरने घेतली
लाईक्स कमेंट्सची
चिंता साऱ्यांना पडली

भ्रष्टाचार नी लाचखोरी
अंगवळणी हो पडली
नीतिमत्तेची लक्तरेच
आता वेशीवर टांगली

वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🔰🌀➿➿➿➿
*गाव तसं चांगलं*

पूर्वीच्या काळी होतं माझं
गाव तसं चांगलं
मिळुन साऱ्या पुढाऱ्यांनी
त्याचं वाभाडं काढलं!!

जंगल होतं सारं
झाडाझुडूपांनी व्यापलेलं
उभे राहिलेत तिथे आता
मनोरे उंचच उंच!!

शिळोप्याच्या गप्पा मारायला
असायचा झाडाभोवती पार
आता बंद सदनिकेत
उडतोय दारूचा बार!!

सणावाराला भेटत असत
गावकरी एकमेकांना
आता भ्रमणध्वनीवरून
येतात अबोल कोरड्या भावना!!

तसं माझं चांगलं गाव
आता आठवणीतच उरलंय
आधुनिकतेच्या नावाखाली
सारं काही सरलंय!!!

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🔰🌀➿➿➿➿
*गाव तसं चांगलं*

चंद्र तारकांचे झुंबर म्हणे आकाशाला भार झाले
म्हणुनच म्हणे इंद्रधनूचे विजेच्या कडाडात वार झाले

मग कोणी उगाच केले प्रश्न अमावस्येवर
सांग पुनवेत तुझे किती अन कोणते यार झाले

ती उत्तरली चंद्र आणि तारका आहेत साक्षीला
नकळत डोळ्यातील अश्रू खारेखार झाले

उगवतो चंद्र आणि सूर्य नित्यनेमाने तरीही
का माझ्या प्रेमावर नित्य वार झाले

गाव तसं चांगलं पण चालते चुकीच्या कायद्याने
जर काळोखात कोर्टात उभे साक्षीदार झाले

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🔰🌀➿➿➿➿
*गाव तसं चांगल*

माझ्या गावात
कौलारू घर
अंगणात रांगोळ्या
गाव तसं चांगलं

गावात राहती
साधी माणसं
माणसात असे
माणुसकीचा अंश

गावा लगत डोंगर
तेथे झाडे हिरवेगार
नदी किनारी वसलेलं
गाव तसं टुमदार

गावात असे मंदीर
शांती असे तेथे स्थिर
लोक येथे सज्जन
मंदिरी करे भजन

संकटाची येई चाहुल
लोक मदतीला येई धावून
सर्व राहती मिळून मिसळून
गाव तसं चांगल

*श्री.पुरुषोत्तम ठोंबरे*
*बंधुनगर,झिंगाबाई टाकळी*
*नागपूर*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🔰🌀➿➿➿➿
*गाव तसं चांगलं*

म्हणती सारे जण खुल्लम खुला,
साऱ्या दृष्टीने *गाव तसं चांगलं*…
एकमेकांची कुरघोडी करण्यात,
गावाने गावास वेशीला टांगलं…१

द्वेष तिरस्कार हिंसा बोकाळली,
रक्ताच्या नात्यात दुफळी माजली…
कोण कुणाची करी आगपाखड,
इभ्रत सरेआम कलंकी गाजली…२

प्रेम अहिंसा त्याग आपुलकी,
दूर दूर दिसेना स्नेह माणुसकी…
स्वार्थापुढे विकून लाज शरम,
आचार विचार दर्शवी कुजकी…३

संस्कारप्रिय गावाची झाली दशा,
राजनेत्यांनी पाजताच दवा…
घराघरात पोहोचली राजनिती,
नात्यात वाहू लागली वैरी हवा…४

सत्ता प्राप्तीच्या हव्यासापोटी,
करती गावाची राखरांगोळी…
*सुधाकरा* अमृतासम नात्यांची,
पेटवून गेले गावोगावी होळी…५

*सुधाकर भगवानजी भुरके*
*आर्य नगर नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🔰🌀➿➿➿➿
*गाव तसं चांगलं*

गाव तसं चांगलं असतं
गावात लोक मायेची
बसून रोज चावडीवर
गप्पा गोष्टीत रंगायची

मिळूनमिसळून राहतात
सुख दु:ख ते जाणतात
कधी अडलं तर तेथील
लोक मदत पण करतात

सभोवती हिरवी झाडे
शुद्ध निरोगी वातावरण
पहाटे उठून करती बाया
घरादारात सडा सारवण

राहणीमान साधे त्यांचे
साधी भोळी माणसं ती
कष्टात जीवन त्यांचे तरी
आनंदाने जगत असतात ती

शहर असते गजबजलेले
गावाची नाही त्याला सर
गाव तसं चांगलंच असतं
ना कारखाने ना दुषित धूर

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🔰🌀➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे