जेएसएम महाविद्यालयात रंगली ‘यादों की बारात’
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
जेएसएम महाविद्यालयात रंगली ‘यादों की बारात’
जेएसएम व अॅड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: जे. एस. एम कॉलेज व अॅड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ च्या माजी विद्यार्थ्यांच्या यादों की बारात-पर्व २ या स्नेहमेळाव्याचे आयोजन रविवार, दि. ०५ जानेवारी २०२५ रोजी जे. एस. एम. कॉलेज अॅल्युमनी असोसिएशन आणि अॅड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ अॅल्युमनी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. या स्नेहमेळाव्याच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून मा. अॅड. गौतम पाटील, अध्यक्ष, जनता शिक्षण मंडळ, अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघटना, जे. एस. एम. कॉलेज, अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघटना, अॅड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ हे उपस्थित होते. तर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मा. श्री. प्रशांत नाईक, मा. नगराध्यक्ष, अलिबाग नगर परिषद हे उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर मा. डॉ. साक्षी पाटील, उपाध्यक्ष, जनता शिक्षण मंडळ, मा. श्री. गौरव पाटील, सेक्रेटरी, जनता शिक्षण मंडळ, उपाध्यक्ष, माजी विद्यार्थी संघटना, जे. एस. एम. कॉलेज, मा. डॉ. अनिल पाटील, सेक्रेटरी, माजी विद्यार्थी संघटना, जे. एस. एम. कॉलेज, मा. अॅड. महेश पटेल, उपाध्यक्ष, माजी विद्यार्थी संघटना, अॅड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ, मा. अॅड. स्वप्नील पाटील, सेक्रेटरी, माजी विद्यार्थी संघटना, अॅड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ, मा. डॉ. सोनाली पाटील, प्राचार्य, जे. एस. एम. कॉलेज, मा. अॅड. नीलम हजारे, प्राचार्य, अॅड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ आदी मान्यवर उपस्थित होते.
‘यादों की बारात-पर्व २’ या नावाने आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचा सुवर्णयोग जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अॅड. गौतम पाटील यांच्या पुढाकाराने जुळून आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, प्राचार्य अॅड. नीलम हजारे यांनी दोन्ही महाविद्यालयांच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मा. अॅड. गौतम पाटील यांनी स्व. नानासाहेब कुंटे, अॅड. दत्ता पाटील यांनी हे कॉलेज नावारुपास आणण्याकरिता केलेल्या कार्याचा आढावा घेऊन आगामी विकास योजनांची माहिती उपस्थितांना देत महाविद्यालयाच्या विकासात हातभार लावण्याचे आवाहन माजी विद्यार्थ्यांना केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. सचिन कांबळे यांचा त्यांनी कला क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांचा मा. अॅड गौतम पाटील यांच्या शूभहस्ते सत्कार करण्यात आला डॉ. अनिल पाटील, सेक्रेटरी, माजी विद्यार्थी संघटना यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी जनता शिक्षण मंडळाच्या संचालक मा. सौ. शैलाताई पाटील यांसह संचालक मंडळाचे सदस्य व विविध ठिकाणाहून आलेले २०० माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रांगणात जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी ‘खेळ पैठणीचा’ व संगीत खुर्ची अशा मनोरंजक खेळांचे आयोजनही करण्यात आले. त्यानंतर अनेक माजी विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य, अभिनयाचा आविष्कार घडविणारे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. स्ट्रिंग्स फॅमिली, अलिबाग यांच्या ‘म्युझिकल शो’ने कार्यक्रमात रंगत आणली. अक्षय म्हात्रे, हर्षल पाटील यांनी सादर केलेल्या मराठी-हिंदी गाण्यांवर ताल धरत उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.