सर्पमित्र आनंद भगत ‘कुलाबा जीवन गौरव’ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
सर्पमित्र आनंद भगत ‘कुलाबा जीवन गौरव’ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: (जि.प्र.) तालुक्यातील आवास गावचे रहिवासी सुप्रसिद्ध सर्पमित्र आनंद दत्तात्रेय भगत यांनी आजवर अनेकांच्या घरात किंवा घराच्या परीसरात आलेले २०० पेक्षा अधिक सर्प, ४ घोणस व १ अजगर जिवंत पकडून ते दूर जंगलात सोडले आहेत. त्यामुळे या प्राण्यांचे जीव वाचले आहेत आणि लोकांना कोणत्याही प्रकारची इजा सुध्दा झाली नाही. विशेष म्हणजे कोणताही मोबदला न घेता ते हे काम करीत आहेत.
शुक्रवार दि. ३ जानेवारी २०२५ रोजी आद्य शिक्षिका, कवयित्री सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त मधुशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट – रायगड, भाई जगताप मित्र मंडळ – रायगड आणि अॕड. उमेश ठाकूर मित्र मंडळ – रायगड, यांच्या संयुक्त विद्यमाने सातिर्जे, अलिबाग-रायगड येथे त्यांना आमदार भाई जगताप, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार रविंद्र धनगेकर, सुप्रसिद्ध गायक संतोष चौधरी [ दादुस ], रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य रविंद्र ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव प्रविण ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष सुनिल थळे, काँग्रेस सेवा फाउंडेशन रायगडचे अध्यक्ष अॕड. उमेश ठाकूर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत
“कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार – २०२५’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
त्याबद्दल आनंद दत्तात्रेय भगत यांचे अलिबाग तालुका पंचायत समिती माजी सदस्य रणजीत प्रभाकर राणे, ग्रुप ग्रामपंचायत आवासच्या सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य अभिजीत प्रभाकर राणे, उपसरपंच राजेंद्र वाकडे, सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, आवास ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. तसेच समाजातील सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.