ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध
आली रे होळी
कुसुम पाटील कसबा बावडा, कोल्हापूर

0
5
1
7
5
8
आली रे होळी
आली रे होळी आली
तनमन माझे डोलू लागले
स्पर्श सजनाचा झाला
शामरंगात मी नहाले
रंगाच्या मैफिल होळीत
वातावरण आबोलाही बोले
दुःख विसरून नाचू लागे
आनंदाने काव्य ही डोले
धुंद भिरभिर नयनावर
आगळी नशा ही चढली
सप्तरंगात या होळीच्या
हृदयी माझ्या तार छेडली
देहभान विसरले आज
एकमेकांना रंगवताना
राधा तर झाली कान्हाची
इंद्रधनुष्य रंगाचे चढवताना
उत्साह वाढला खेळताना
सजणीच्या प्रेमात रंगला
मोरपिसे पिसारा तनूवरी
जादूई रंगानी खूपच खुलला
कुसुम पाटील
कसबा बावडा, कोल्हापूर
0
5
1
7
5
8



