
0
4
0
8
9
0
सरबराई
आले लग्नाचे पाहुणे
त्यांची करा सरबराई
चहा पाण्याची करा व्यवस्था
कमी नका करा बाई
माझ्या मुलीच्या सासरचे
त्यांना द्या पाय धुवायला
टीका लावा सर्वांना
टॉवेल द्या पाय पुसायला
जेवणाची करा तयारी
कार्यक्रमाला आहे वेळ
समजदार आहेत पाहुणं
जमवून घेतात ताळमेळ
माझ्या माणसाचे इवाई
आहेत मोठे समजदार
त्यांचा आहे मोठा वाडा
सुंदर आहे घरदार
चांगली करू सरबराई
नका करू तुम्ही घाई
आरामात द्या जेवायला
घाई करायची कशाला
केवलचंद शहारे
सौंदड गोंदिया
0
4
0
8
9
0





