बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील विजेत्यांच्या कविता
मुख्य संपादक राहुल पाटील
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*🥀विषय : फसवी पिढी🥀*
*🍂बुधवार : १०/ डिसेंबर /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*खालील विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक १९६ साठी लवकर साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*फसवी पिढी*
या सोशल मीडीया आधी
किती होती बिचारी साधी
काळ बदलला डाव साधून
उलटी वाहू लागली नदी..
मग सुरू झाली वादावादी..
फसवी पिढी कलंकाची रेघ
सांगा कुणी ओढली?
हार जीतची तुलना होई
किती किती स्पर्धांची यादी..
मग सुरू झाली वादावादी..
सोयीपुरती नीती आखणं
दोषी ठरवणं चालू पिढीला
तणावाचीच क्रूर सावली
झाली ना बेईमान गादी..
मग सुरू झाली वादावादी..
वाळवी लागली जीवना
गुन्हा त्यांचा कोणता
स्वार्थापोटी वैरी झालो
रक्ताच्या नात्यांचीही खरेदी..
मग सुरू झाली वादावादी..
अपेक्षांच्या ओझ्याखाली
दुरावली मनाजोगी संधी
जोर जबरदस्ती यामुळेच
नैराश्याची लागली नांदी..
मग सुरू झाली वादावादी..
नसे पिढी ही फसवी भावा
आपण सोडू आता दिखावा
घेऊ द्यावी हवी तिथे उडी
नको लागू कुणाच्या नादी..
मिटून जाईल वादावादी..
*सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा*
*मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🍃🔸♾️♾️♾️♾️
*फसवी पिढी*
जुनं तेच सोनं ,कशाला सोडतो।
वचनं संतांचे ,सारखा खोडतो।।
आईबाप आणि,जाण गणगोत।
स्वार्थाने माणसा,सर्वांस तोलतो।।
वागणूक ठेवा ,ईथे समतेची।
जातीपाती मुळे,माणूस तोडतो।।
वादविवादाला ,नको देऊ थारा।
शब्द बोलावे जे,काळीज जोडतो।।
कर्म करु थोर ,जन कल्याणाचे।
दुष्कर्मी कपटी ,दुःखास भोगतो।।
फसवी पिढीचा ,नको धुरंधर।
चक्र फसल्याने, रथास ओढतो।।
जीवन प्रवास ,हा खेळ घडीचा।
स्वतःच खेळून ,डावास मोडतो।।
*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा. जि यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🍃🔸♾️♾️♾️♾️
*फसवी पिढी*
डिजीटल झाली दुनिया खऱ्या वास्तवाशी नाते तोडून
लाईक,शेअर,सबस्क्राईब करा हे सांगती हात जोडून
डोळे मिटून जग पाहण्या जणू स्क्रीनच झाला देव्हारा
लाईक च्या ओझ्याखाली आपला आत्मा देतो विकून
ही फसवी पिढी आहे की आहे तंत्रज्ञानाचे मोहजाळ
भ्रमांच्या बाजारात, माणूस जातो माणुसकीला सोडून
सत्याला फिल्टर लावून, काढतो खोट्याची मिरवणूक
क्षणिक यशाच्या मागे, आयुष्याची वाट चालली मोडून
फसव्या पिढीला जगाचा खरा आरसा दिसला पाहिजे
अन् वास्तव जगात परतून यावे डिजीटल जग सोडून
विझलेल्या राखेतून निखारे, एखाद्या दिवशी पेटतील
खऱ्या अर्थाच्या जगण्यासाठी येईल नवी पिढी घडून
*मोहिनी निनावे*
*आनंद नगर, नागपूर.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🍃🔸♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*फसवी पिढी*
ऐक तरूणा ऐक तू, भारताचा आधारस्तंभ
तुलाच तर व्हायचे,नव्या परिवर्तनाचा आरंभ//
तुझी शक्ति,भक्ती,युक्ती, एकवटावी ध्येयाप्रती
सारासार विवेक बुद्धी,अढळ राहो संयमी वृत्ती/
प्रलोभनांचे मायाजाल, तुझ्या भोवती गुंफतेय
कळत नकळत तुझे मन, सहज त्यात गुंततेय//
अफू, चरस,ड्रग,हेराॅईन, यात खोल फसतोय
गांजा,मदिरा,व्यसनात, तू स्वतःला संपवतोय./
आंतरजालीय चक्रव्यूहात, सहज होतोय प्रवेश
गुरफटतोय मन मेंदू, दिसेना परतीचा मार्ग शेष/
ऐहिक सुखोपभोगाची, तर कमालीची आसक्ती
ना आदर ना कदर कुणाची, बेफिकीरी प्रवृत्ती/
ऐन तारुण्यात तुलाच, येवू पाहतेय घोर वैफल्य
जन्म, जीवन, जिवीताचे, कसे होईल साफल्य/
कसा ठेवशील पारदर्शी, या चारित्र्याचा आरसा
कोणता देशील आदर्श, भावी पिढीकडे वारसा/
“फसवी पिढी” म्हणून, तुला लागू नये रे कलंक
कर्तृत्व असे कर की, माथी लागो विजय तिलक
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🍃🔸♾️♾️♾️♾️
*फसवी पिढी*
काळाचे चक्र उलटे फिरले
फसवाफसवीचे वारे वाहिले
लहान थोर यात अडकले
अती हव्यासापोटी हे घडले
तरुणांची तर माथी फिरली
फसवी पिढी निर्माण झाली
मोबाईल यांच्या हाती आले
आभासाशीच नाते जडले
खोटी माहिती, प्रोफाईल खोटे
भवती व्यसनांचे पसरे जाळे
आंतरजालच का वैरी झाले?
झटपट पैशाचे मार्ग शोधले
बेटिंग, लॉटरी,आमिषे किती
खोट्या नोकरीच्या जाहिराती
तरुण प्रलोभना बळी पडती
पालकांना सहजी फसवती
वेळीच सावध व्हा तरुणांनो
महत्त्व ओळखा नीतिमूल्यांचे
इन्स्टा.लाईफ फसवे असते
तुम्ही स्वत:ला हो समजवायचे
मायाजाल हे असे काटेरी
तुम्हा यश मिळवायचे परी
प्रयत्नांची पराकाष्ठा करून
पाऊल ठेवा यशोशिखरावरी
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🍃🔸♾️♾️♾️♾️
*फसवी पिढी*
चमचमते मोबाईल हातात
डोळयात दिवास्वप्न घेऊन
बोलण्यापूर्वी विचार नाही
विचार करत बसते बोलून
जाहिरातबाजीच्या युगात
खोट्या अमिषाला भुलली
सत्य कुठेतरी हरवले आहे
खोट्याची वाहवा झालेली
सोशल मीडियाचा पगडा
लाईक साठी घेतात धाव
जवळच्या नात्याचा विसर
अनोळखी नात्याची हाव
खोट्या यशाची शर्यत सुरू
सत्य मागेच पडून राहिली
ओळखी शोधत फिरतांना
फसवी पिढी बेधुंद झाली
जेव्हा पाहिले तेंव्हा दिसते
मोबाईलात तोंड खुपसले
एकटक पाहत,बोटे चाळत
खुदकन मधी हसू आलेले
नव्या पिढीला संदेश हाच
खरी माणुसकीच सांभाळा
फसव्या भावना गोंधळात
खरे स्वप्नांचे दिवे पाजळा
*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🍃🔸♾️♾️♾️♾️
*फसवी पिढी*
वर्तमानात बिघडली संस्कृती
दिसत आहे आजच्या घडीला
आज मुलगा नाही जुमानत
आपल्या जन्मदात्या बापाला
नोकरीच्या नादात सारेच मुले
फिरत असतात खुले खुले
अभ्यासाकडे नाहीच लक्ष
आता आईबाप झाले दक्ष
आयती खायची पडली सवय
नसतो त्यांना कुणाचा भय
गुन्हेगारीकडे वाढला कल
त्यापरीने करतात हालचाल
आजची पिढी फसवी पिढी
नाही सोडले सख्ख्या नात्यांना
वडावरचे पिंपळावरचे सांगून
फसवतात आपल्याच लोकांना
सुसंस्कृत पण गेला निघून
नाही राहिली विश्वासाची परत
कुणाचा ठेवणार विश्वास
तशाच अवस्थेत आहेत जगत
कुठेना कुठे फसत आहे माणूस
हे सुद्धा असते माहित
या जगात नसते आपला
कुणाचा करणार हो हीत
स्वतःचे काम करा स्वतःच
नका लागू रे कुणाच्या नदी
थोडा जागव रे मानवा विवेक बुद्धी
वेळेत करून घे काम आदी
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🍃🔸♾️♾️♾️♾️
*फसवी पिढी*
आजची फसवी पिढी
मोबाईलनी झाली वेडी
मोबाईलचे आवाज काढी
चित्र-विचित्र त्यांची गोडी ॥१॥
रिंगटोन करती फजिती
वाजते मोबाईची घंटी
अनेक रंग-ढंग किती
प्रकार आहेत दुप्पटी ॥२॥
सकाळ संध्याकाळ
एकच मनाला ध्यास
नाही त्यांंना काळ वेळ
मोबाईल असे जवळपास ॥३॥
कोण कुठे गेले या क्षणी
रोज रोज दिसामाजी
समजते तात्काळ तत्क्षणी
इतकी तल्लख बुद्धी,हाजी ॥४॥
नको ते वर्तमानपत्र वाचन
होते देशाचे दर्शन चटकन
मोबाईल यंत्र असते हाती
गौडबंगाल करती साधून ॥५॥
भूत-भविष्याची ना पडली
एकमेव मोबाईल त्यांंचा यार
अंतरिक्ष शोध घेती प्रज्ञावंत
मोबाईल धारकांचा हा विचार ॥६॥
मोबाईलची लहानशी कळ
साऱ्यांना फिरवी दुनियाभर
घालवी किमयागार मरगळ
बातमीदार बाळ वावरे चौफेर॥७॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🍃🔸♾️♾️♾️♾️
*फसवी पिढी*
मोबाइलच्या युगात
फसवी पीढ़ी घडते
आधुनिकतेच्या नावाने
तरुण मोहजालात पडते
नसतो विश्वास यांचा
स्वतःच्या आई-वडिलांवर
उलट उत्तरे देऊन ठेवते
दहशतीत त्यांनाच घरभर
आलेले अपयश यांना
पचवीने जमत नाही
संकटातून मार्ग काढणे
कधीच जुळत नाही
आहारी गेले व्यसनांच्या
पैसा नेहमी कमी पडतो
वडिलांची संपत्ती विकून
शोक तरी कसा पूर्ण होतो?
झटपट श्रीमंत होण्याची
लागली पिढीला पैज आता
उलटसुलट कामे करून
तुरुंगाची हवा खाता!
*डॉ. बालाजी राजूरकर*
*हिंगणघाट जि. वर्धा*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸🍃🔸♾️♾️♾️♾️
*फसवी पिढी*
पिढी फसवी आमची
नसे जिला आत्मभान
मायबापा दिले ज्यांनी
वृद्ध आश्रमाचे दान
पिढी फसवी आमची
नसे उपकारा वाव
अन्न दिले ज्या मातीने
करी तिचाच लिलाव
पिढी फसवी आमची
गायी प्रगतीचं गान
शुद्ध भाव विसरून
दिखाव्यास मानपान
पिढी फसवी आमची
हावं संपत्तीची फार
क्षेत्र असो कोणतेही
दिसे स्पष्ट भ्रष्टाचार
पिढी फसवी आमची
नसे नैसर्गिक जाण
रोज घातक कृतींनी
येई सृष्टीवर ताण
पिढी फसवी आमची
जिथे तिथे गुन्हेगारी
बलात्कारी घटनांनी
झाली मने सुन्न सारी
पिढी फसवी आमची
मुक्त संवादास मागे
समाजमाध्यमी व्यस्त
तारुण्याचे ऊर्जा धागे
*मीता नानवटकर नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️🔸🍃🔸♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



