बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना
मुख्य संपादक राहुल पाटील
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*
*🥀विषय : वर्ष सरतांना*🥀
*🍂बुधवार : २४ / डिसेंबर /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*खालील विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक १९८ साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*वर्ष सरताना*
*वर्ष सरताना करितो*
*एकाग्रतेने सिंहावलोकन*॥
*काय मिळविले काय गमाविले*
*या सर्व बाबींचे विवेचन*॥॥॥॥
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃➰🍃♾️♾️♾️♾️
*वर्ष सरतांना*
विचार करु या
काय कमावले
वर्ष सरतांना
काय गमावले.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃➰🍃♾️♾️♾️♾️
*वर्ष सरतांना*
वर्ष सरतांना सर्वांच्या मनी
आनंद आणि उत्साहाची भावना..
नववर्ष सर्वांना सुख समृद्धीचे
भरभराटीचे जावो हीच कामना…
*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🍃➰🍃♾️♾️♾️♾️
*वर्ष सरतांना*
वर्ष सरतांना मागील
झालं गेलं विसरावं
पुन्हा नव्या उमेदीसाठी
गत चुकांतून शिकावं
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃➰🍃♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*वर्ष सरतांना*
प्रत्येक वर्ष सरतांना खरंच
एक वेळ उजळणी करावी,
काय मिळालं नवीन केलंय
आईसम हो ओंजळ भरावी.
*श्री.रविंद्र भिमराव पाटील*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃➰🍃♾️♾️♾️♾️
*वर्ष सरताना*
अंतर्मनास,त्रास देतील
अश्या नको,कडू आठवणी,
वर्ष सरताना,नको देवा
कोणाच्याही डोळ्यात पाणी.
*मायादेवी गायकवाड ठोकळ*
*मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃➰🍃♾️♾️♾️♾️
*वर्ष सरतांना*
वर्ष सरतांना कॅलेंडरचे
जुने पान बदलले
नवे ध्येयस्वप्न भविष्याचे
जीवनी नवे पान उजळले
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃➰🍃♾️♾️♾️♾️
*वर्ष सरतांना*
वर्ष सरतांना आठवले
क्षण हळवे, गहिरे सारे
परतून आले आज नव्याने
अनुभवलेले सुख दुःखाचे वारे
*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी/चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🍃➰🍃♾️♾️♾️♾️
*वर्ष सरतांना*
षड्रिपूंना तिलांजली देऊया
मागील वर्ष सरतांना
एकमेकांना समजून घेऊया
नव्या वर्षाचे स्वागत करतांना
*सौ. सरला टाले*
*राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃➰🍃♾️♾️♾️♾️
*वर्ष सरतांना*
गतकाळाचा मागोवा
घेतला वर्ष भरतांना
चांगल्या वाईटाचा कानोसा
घेतला दररोज जगतांना
*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃➰🍃♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



