
0
6
7
8
9
1
जनमत
जनतेच्या मनातील विचार
शब्दा शब्दातून उमटू दे
प्रश्न कितीही मोठा असो
जनमताच्या कौलाने कळू दे
नाही दबाव नाही भेदभाव
प्रत्येकाला मान मिळू दे
सत्याच्या वाटेवर चालता
जनतेचा आवाज घुमू दे
गावा गावातून मत कळावे
मना मनातील भावना कळावे
ऐकतेच्या लोकशाहीत
जनमताला स्थान मिळावे
मत वेगळे असले तरी
मनात द्वेष नसावा
या लोकशाहीच्या मंदिरात
सर्वांचा एकोपा असावा
जनतेचा. कौल सर्वोच्च
हाच विश्वास मनात असू दे
याच जनमताच्या शक्तीने
समाजाचा विकास घडू दे
केवलचंद शहारे
सौंदड जि.गोंदिया
0
6
7
8
9
1



