Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रविदर्भ

‘जैन हेरीटेज अ कॅम्ब्रीज स्कूलच्या विद्यार्थ्यांचे धनुर्विद्या सामन्यांमध्ये घवघवीत यश’

जिल्हा प्रतिनिधी, नागपूर

0 4 8 2 9 7

जैन हेरीटेज अ कॅम्ब्रीज स्कूलच्या विद्यार्थ्यांचे धनुर्विद्या सामन्यांमध्ये घवघवीत यश’

जिल्हा प्रतिनिधी, नागपूर

नागपूर: दिनांक १२ आ ँगस्ट २०२४, सोमवार रोजी ‘सेंटर पॉईट स्कूल, दाभा, नागपूर येथे १९ वर्ष वयोगटाखालील वि‌द्यार्थ्यांसाठी आंतरशालेय धनुर्विद्या सामने भरविण्यात आलेले होते. या सामन्यांमध्ये जैन हेरीटेज कॅम्ब्रींज अ स्कूल, फेटरी, नागपूर येथील, विद्यार्थिनी कु. संजना नायर हिने सुवर्ण पदक पटकावून उत्तम धनुर्विद्येचे प्रदर्शन केलेले आहे. सोबतच कु. दिव्या नाईक व उदय बन्सोड या विद्यार्थ्यांनी रौप्य पदक, तर सूर्यांशु वासेकर या वि‌द्यार्थ्याने कास्य पदक जिंकून उत्तम कामगिरी बजावली आहे.

त्यांच्या या विजयाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय रानू सहानी मॅम व उपमुख्याध्यापिका माननीय अर्चना तिवारी मॅम यांनी विद्यार्थ्यांना भरभरून शुभेच्छ्या दिल्या व त्यांनी केलेल्या मेहनतीचे कौतुक देखील केले. तसेच शाळेतील क्रिडाशिक्षक अनिल चव्हाण यांना देखील शुभेच्छ्‌या दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वि‌द्यार्थी आपला सतत सराव करत असतात. अशाप्रकारे वि‌द्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत शाळा नेहमीच तत्पर असते. विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश म्हणजे शाळेसाठी मोठी गौरवाची बाब आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे