
0
4
0
8
8
7
थोडेसे वळून बघ ना….
तू चालत रहा त्या अंतापर्यंत
अनंत एकाकी वाटेवरती
ध्येय तुझे रे ठरलेले
असशील जरी तू एकाकी…
मिळतील त्याचे हात घे
नकळत त्यांची साथ घे
नाहीच भेटले कोणी कधी
अंर्तआत्म्याला आवाज दे….
मिळेल उर्मी मिळेल प्रेरणा
लढण्याला पुन्हा नवचेतना
तुझ्या वरती केवढी आशा
थोडेसेच वळून बघ ना…
जग त्याच आशेवरती
बनून ताकद त्या आसवांची
भरून काढ रे पोकळी
कशास सल त्या उणिवांची….
वाटलेच कधी तरीही एकाकी
एक हात पुढे कर
करून रिते आभाळ भावनांचे
पुन्हा नव्याने उडान भर….
शर्मिला देशमुख -घुमरे
ता.केज जि.बीड
=========
0
4
0
8
8
7





