
0
4
0
8
8
7
पाईक संविधानाचे
चलारे सगळे होऊ, पाईक संविधानाचे।
भारत मातेचे पुत्र,होतील प्रज्ञा सूर्याचे।।
धर्मजात ढोंग आहे ,स्वार्थाने केली व्यवस्था।
संविधान हेच राज्या,जीवनात कल्याणाचे
मानवता हाच धर्म,पाळा अन कर्म करा।
उजळे तेजाने बघा, हे आयुष्य समाजाचे।।
वैरत्वाने वागू नये, माणूस होऊनी जगा।
मनात पेरली बिजे, वायफळ जीवनाचे।।
तुझीमाझी होते रक्षा, संविधान असल्याने।
पोती पुराण आतारे,नाही कुणास हिताचे।।
स्वातंत्र्य समता मैत्री, बंधुभाव मनी ठेऊ।
अंधारात चमकेल , सारे तारे गगणाचे।।
पंचशील पारमिता, या जीवनी अनुसरा।
शोभून दिसेल मग, त्या रुपात अष्टांगाचे।।
गोवर्धन तेलंग.
पांढरकवडा
0
4
0
8
8
7





