Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनदादरा नगर हवेली

मराठा सेवा संघ, दादरा नगर हवेली तर्फे शिक्षक व विद्यार्थी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

प्रशांत ठाकरे, सिलवासा

0 6 1 1 8 9

मराठा सेवा संघ, दादरा नगर हवेली तर्फे शिक्षक व विद्यार्थी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

५० गुणवंत विद्यार्थ्यी व १० उत्कृष्ट शिक्षकांना विशेष सन्मान प्रदान

प्रशांत ठाकरे, सिलवासा

बिनधास्त न्यूज नेटवर्क

सिलवासा, ( दि ८सप्टेंबर): मराठा सेवा संघ, दादरा एवं नगर हवेली यांच्या वतीने आयोजित शिक्षक व विद्यार्थी सन्मान सोहळा सिल्वासा नगरपालिका अध्यक्ष आदरणीय श्री. सोमनाथ पाटीलजी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. हा कार्यक्रम गार्डन सिटी कम्युनिटी हॉल, सिल्वासा येथे आयोजित करण्यात आला होता.

मराठा सेवा संघाच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून इयत्ता १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला जात आहे. यावर्षीही या परंपरेनुसार सुमारे ५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १० उत्कृष्ट शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनुकूल निकम, डॉ. रश्मी निकम तसेच श्री. बलवंत पाटीलजी यांची विशेष उपस्थिती लाभली.

दादरा एवं नगर हवेलीचे सेवानिवृत्त अधिकारी तथा मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री. अनंतराव निकम तसेच उद्योगपती श्री. भाऊसाहेब डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा सेवा संघ विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवत आहे.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना श्री. सोमनाथ पाटीलजी यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आई – वडिलांनी घेतलेल्या कष्टांची जाणीव ठेवून त्यांच्या मेहनतीचे सार्थक करण्यासाठी जीवनात मोठे ध्येय ठेवावे, असे आवाहन केले.

डॉ. अनुकूल निकम यांनी बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी शिक्षणाला प्राधान्य देऊन आधुनिक ज्ञान व कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. तर श्री. बलवंत पाटीलजी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांनी काळानुरूप आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्तृत करून सातत्याने नवीन गोष्टी शिकत राहावे, अशी प्रेरणा दिली. या सन्मान सोहळ्यास समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष शिवश्री भाऊसाहेब डेरे, श्री. संदीप पाटील, मराठा सेवा संघाचे प्रदेश महासचिव शिवश्री योगेश सोनवणे तसेच मराठा सेवा संघाचे कोषाध्यक्ष शिवश्री राजेंद्र वाघ यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली श्री.संदीप पाटील,श्री. चंद्रशेखर कणसे, श्री. प्रशांत ठाकरे, श्री. भरत सोनवणे, श्री. दिनेश देसले, श्री. राजेंद्र वाघ, श्री. स्वप्निल शेवाळे जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा श्रीमती सविता ठाकरे,मेघा वाघ,विद्या कणसे,प्रांजली पाटील,कविता सोनवणे,मनिषा वाघ यांच्यासह शिक्षक व समाजबांधवांनी अथक परिश्रम घेतले.

या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, शिक्षकांना सन्मान आणि समाजातील शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा देण्याचा प्रेरणादायी संदेश मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रशांत ठाकरे सरांनी केले तर आभार श्री.राजेंद्र वाघ यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 1 1 8 9

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे