आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरनांदेडमराठवाडासाहित्यगंध
लिहत रहा
भोसले तानाजी निवृत्तीराव
0
4
8
3
0
1
लिहत रहा
मिळाले हे दान देवाचे
त्याला तू वाटत रहा
दोन हाताची पाच बोटे
त्यानेच तू लिहत रहा
डोळे दिले बघण्यासाठी
दृष्टी चांगली ठेवत रहा
सत्कर्म करण्या जणांसाठी
रस्ता पुण्याचा दावत रहा
मराठी भाषा उत्थानासाठी
शब्द कोडे तू सोडवत रहा
मराठीचे शिलेदार समुहासाठी
सकल ज्ञानी जण जोडत रहा
चिकित्सकतेच्या कळसावरती
पाऊल सदैव तू ठेवत रहा
कष्ट कितीही पडतील करण्या
ज्ञानाची पणती तू तेवत रहा
मार्ग हा नक्कीच मिळेल तुजला
कक्षा ज्ञानाची तू रुंदावत रहा
शब्दाने होते ह्या वृध्दी ज्ञानाची
शब्दात शब्द तू गुंफत रहा
भोसले तानाजी निवृत्तीराव
ता.देगलूर जि.नांदेड
0
4
8
3
0
1



