भाजपाच्या अधिवेशनाकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फिरविली पाठ
तीन तास थांबल्यानंतर कार्यकर्ते नाराज होऊन गेले परत
तारका रूखमोडे, प्रतिनिधी
गोंदिया: आगामी विधानसभा निवडणुका पाहता भारतीय जनता पार्टी गोंदिया च्या वतीने सडक अर्जुनी तालुक्यात जिल्हा अधिवेशन आयोजित करण्यात आले असून भाजप कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे येणार होते मात्र नागपूर ग्रामीण भागात एक आंदोलन सूरु असून बावनकुळे हे त्यां ठिकाणी गेल्याने गोंदियात आयोजित जिल्हा अधिवेशनाला येऊ शकले नाही.
त्यामुळे कार्यकर्त्यांना दौऱ्याची माहिती होताच कार्यकर्ते देखील उठून पळाले. तर नुकतेच विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले डॉ परिणय फुके यांना कार्यकर्त्यांना आणि माध्यमाना भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे येऊ शकणार नाही अशी माहिती फुके यांनी दिली दिली .
सडक अर्जुनी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे असल्याने मागील आठवड्यात राष्ट्रवादी नेते खा प्रफुल पटेल यांनी सडक अर्जुनी तालुक्यात आपलाच आमदार निवडून येईल असे सूचक वक्तव्य खा प्रफुल पटेल यांनी केले होते त्यामुळे तर नाही ना आजच्या अधिवेशनात भाजप प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी पाठ तर फिरविली नाही ना असा प्रशन या निमित्ताने उपस्थित केला जातं आहे.





