ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरवर्धाविदर्भसाहित्यगंध
पोळा-पाडव्याच्या आठवणी
डॉ. बालाजी राजूरकर हिंगणघाट जि. वर्धा
0
4
8
2
9
0
पोळा-पाडव्याच्या आठवणी
माशा मुरकुटे घेऊन जा गे,
मारबतचा आवाज आला.
हाती घेऊन पळसाचे मेडे,
जथ्था डोंगराकडे निघाला.
सोडे बेलपत्री मेडे पाण्यात,
रोगराई गेली वाटतं मनात.
रंगल्या छान कुस्त्या वाळूत,
आनंद झाला पोहून पाण्यात.
जमा केल्या फांद्या डोंगरा,
समाविष्ट लोखंडीसह भेरा.
पाडव्याला आणले घरा,
फिरून गाव लावले दारा.
रंगला जुगार पत्यांचा चौकात,
झंडी-मुंडीची दुकाने थाटलीत.
मटण-चिकन शिजले घरांत,
सुगंध मसाल्याचा दाटे गावात.
झिंगताना दारुड्यांचे टोळके,
शिव्या-शाप तोंडातून झरके.
रंगत आली मंदिराचे पारावर,
लहानथोर जपत स्नेह घरोघर.
डॉ. बालाजी राजूरकर
हिंगणघाट जि. वर्धा
0
4
8
2
9
0



