0
4
8
2
9
0
स्पर्शगंध
तिच्या डोळ्यातला स्पर्शगंध
करी दिवसरात्र मनावर धुंद,
कपाळ विशाल व रुंद
भोवया दाट काळ्याकुट्ट…!!१!!
मदन मंजिरी भासते कधी
चंद्र, कुंकू कपाळी टिळा,
मदहोश नजरेची भरते शाळा
साडीचा रंग पाहून जांभळा…!!२!!
गळ्यात हार मोत्याचा
चाफा माळला फुलांचा,
लांब केस काळे पाठीवर
तीळ शोभे हनुवटीवर…!!३!!
चुडा हिरवा शोभे हातात
पाई छुमछुम घुंगरू पायात,
सुबक कोपऱ्या शोभे दंडात
कुंकू भरले लांब भांगात…!!४!!
केवडा सुगंध श्वासात
माजली खळबळ मनात,
अनवाणी चालली वाळूत
जशी तुफान लाट सागरात…!!५!!
सुरेखा रा.चित्ते
श्रीवर्धन जि. रायगड
========
0
4
8
2
9
0



