0
4
8
3
0
1
वर्षाराणी
कृतिका रोहीणी
मृगाच्या बहीणी
सोबत वर्षाराणी
चिंब झाली धरणी
वर्षाराणी आली
वस्त्र पांढरे लेवुनी
शेतशिवारे भिजली
पाऊस बरसूनी
कोसळतात सरी
कधि धुव्वाधार
गारवा वातावरणात
येतो कधि महापूर
क्षणात येतात शिरवे
श्रावण सरींची गम्मत
मन डोले हिरवे बरवे
वर्षाराणीची सोबत
हिरवीगार झाडे डोंगर
निसर्गाचा सुंदर आविष्कार
मनात आनंदी विचार
वर्षाराणीस नमस्कार
ज्योती चारभे
ता.जिल्हा वर्धा
=========
0
4
8
3
0
1



