Breaking
ई-पेपरकवितामराठवाडासाहित्यगंध

गनिमी कावा

संग्राम कुमठेकर ता. जि. लातूर

0 5 9 4 1 4

गनिमी कावा

उरात धडकी अंगात कापरं
बोबडी वळे नि अवसान गळे
गनिमी कावा रे राबवी शिवा
लावून अंगणी स्वराज्य दिवा

स्वराज्याचं स्वप्नं केलं साकार
बहुजनहित साधण्या सरकार
शिवनीतीची करू या जपणूक
माणुसकीची ठेऊ या वागणूक

गनिमी कावा शोभे शंभू छावा
धारातीर्थी वीर वढुबुद्रूक गावा
विद्वान,शूर राजा प्रजाहितदक्ष
न्यायनीतीचे राज्य होता कटाक्ष

गनिमी कावा महान युद्धनीती
अंधाऱ्या राती तलवार रे हाती
सह्याद्रीचा सिंह फोडे डरकाळी
चंद्रकोर तिलक शोभे रे कपाळी

मूर्ती लहान तरीही किर्ती महान
भुकेल्यास अन्न भागवी रे तहान
न भूतो न भविष्यती रे सत्कार्य
गनिमी कावा जाणा रे शिवकार्य

संग्राम कुमठेकर
ता. जि. लातूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 4 1 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे