बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना
मुख्य संपादक: राहुल पाटील
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*
*🥀विषय : बहर*🥀
*🍂बुधवार : १५/ जानेवारी /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*बहर*
*संपेल ही पानगळ*
*येईल मग बहर नवा*॥
*तोपर्यंत तरी सबुरी हवी*
*तोपर्यंत तरी मनी धीर हवा*॥॥॥॥
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अ.नगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌷🔸🌷♾️♾️♾️♾️
*बहर*
*वृक्षवल्ली बहरली*
*वसुंधरा ही नटली*
*मृग मयूरा झाला हर्ष*
*कोकीळ गात सुटली*
*श्री. राजेश लक्ष्मीकांत धात्रक, ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌷🔸🌷♾️♾️♾️♾️
*बहर*
उजाड माळरानी या
बहरली जशी वृक्षवेली
तूझ्या पावलांनी माझ्या जीवनी
सुखाची ही पहाट उगवली
*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌷🔸🌷♾️♾️♾️♾️
*बहर*
*पानगळ झालेला वृक्ष*
*फुलला बहर वसंताने*
*कोवळी नाजूक पालवी*
*घेई उभारी नवचैतन्याने*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌷🔸🌷♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे. अंक क्र १५४ साठी आजच साहित्य पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*बहर*
लाभता तुझी साथ
चढला मज बहर
कर्तृत्वाच्या सुगंधाने
केला बघ कहर
*सारिका डी गेडाम, चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌷🔸🌷♾️♾️♾️♾️
*बहर*
जगताना सहवास सोबत
निरंतरपणे प्रत्येकच प्रहर,
आईच्या विचारांनी खरंच
जीवनामध्ये असतो बहर.
*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌷🔸🌷♾️♾️♾️♾️
*चारोळी -बहर*
बहर आला फुलांना
गंधाळली रातराणी
रंगी बेरंगी शेवंतीही
उमलली पानोपाणी.
*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी/चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌷🔸🌷♾️♾️♾️♾️
*बहर*
पडता तुझे पाऊल
गंधाळली बघ वाट
जीवनाला आली बहर
जन्मोजन्मीची ही भेट
*विवेक पाटील*
*मालेगाव (नाशिक)*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌷🔸🌷♾️♾️♾️♾️
*बहर*
तुझ्या आगमनाने
आला होता जगण्याला बहर
कधी उध्वस्त झाली बाग
होते मी बेखबर
*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार*समूह*
♾️♾️♾️♾️🌷🔸🌷♾️♾️♾️♾️
*बहर*
पदार्पण होता वसंताचे
येतो बहर आम्रवृक्षाला
कुहू कुहू कोकीळा करते
प्रेमबाधा होतसे मदनाला.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌷🔸🌷♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



