
0
5
1
7
8
8
होलिकोत्सव
इंद्रधनूचे लोभस, मोहक रंग
मनास आल्हाद सुखावतात ॥
उत्सवाचा प्रेमळ सुगंध
चैतन्य नवे मनी पसरवतात ॥
माणुसकीचा रंग लवलेशमात्र नाही
उदारतेचे सोंग घेतात ॥
निरर्थक, क्षणभंगुर लोभापायी
किती निष्पाप जीव चिरडतात ॥
मुकवेदनांसंगे आक्रोश किती
बधिरतेचा आव आणतात ॥
कत्तल निसर्गाची करुनी
कोणते सुख त्यात शोधतात ॥
पाश स्वतःलाच आवळुनी
अर्थहीन आनंद शोधतात ॥
खरेपणाचे वस्र पांघरुनी
गळे का दीनांचे कापतात ॥
जगण्याचा अर्थ उमजत नाही
स्वप्नसुखांमागे उगा धावतात ॥
होलिकेत राक्षसांचा संहार जोवर होत नाही
निष्पाप केविलवाणे तोवर हतबल होऊन जगत राही ॥
कल्पना सुपेकर
राहुरी, जि.अहिल्यानगर
0
5
1
7
8
8



