अरण्येश्वर शिक्षण संस्थेचा ‘प्रवेशोत्सव’ धुमधडाक्यात साजरा
वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे
अरण्येश्वर शिक्षण संस्थेचा ‘प्रवेशोत्सव’ धुमधडाक्यात साजरा
वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे
पुणे: आज दिनांक 15/06/2024, शनिवार आज इयत्ता बालवर्ग ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे अरण्येश्वर विद्यामंदिर व माध्यमिक विद्यालय शाळेमध्ये स्वागत करण्यात आले. मुलांच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. एक छान सेल्फी पॉइंट सजवला होता. फुग्यांची आरास केली होती. फुग्याचे वेगळे आकर्षण म्हणजे लाईट लागणारे फुगे सजावटीसाठी आणले होते. छान टोप्या त्यांच्या डोक्यावर सजल्या होत्या. मुलांचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
प्रत्येक नवे बालक – बालवर्गात व पहिलीत पहिले पाऊल ठेवणारे मूल उत्साहात आई-बाबांच्या हाताला हात धरून आलेले होते. नजर जरा कावरी बावरी होती. अशा सर्व नवागतांच्या स्वागतासाठी प्राथमिकच्या मा. मुख्याध्यापिका सौ.अनिता गायकवाड व माध्यमिकच्या मुख्याध्यापिका सौ. जाधव बाई तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्व उत्सुक होते.
दोन्ही विभागाच्या मुख्याध्यापकांनी मुलांना कुंकू लावले. फुलांचा वर्षाव केला. मुलांना गिफ्ट दिले. चॉकलेट दिले. मुलांचे उत्साहात स्वागत झाले. नंतर प्रत्येक मुलाचा सेल्फी पॉइंट वरती फोटो काढण्यात आला. सर्व शिक्षकांनी देखील याचा मनमुराद आनंद घेतला. पहिल्याच दिवशी मुलांना पुस्तकाचे वाटप केले गेले. पुस्तक मिळाल्यामुळे सर्व मुलं खुश झाली.
मुलाचे पहिले पाऊल आज सरस्वती मंदिरात
आता शिक्षण घेणार मुले आनंदात
आई-बाबांबरोबर आलेली ही मुले
पाटी- दफ्तर लावून आली हर्षात.





