कुही फाट्यानजीक ट्रकने कट मारल्याने मोपेड चालक ठार तर इतर दोन जखमी
तालुका प्रतिनिधी भिवापूर
कुही फाट्यानजीक ट्रकने कट मारल्याने मोपेड चालक ठार तर इतर दोन जखमी
तालुका प्रतिनिधी भिवापूर
भिवापूर/ कुही : रविवार असल्याने शहरातील अनेक जण आंभोरा येथे देवदर्शन व पर्यटनासाठी आलेल्या व परतीच्या प्रवासादरम्यान कुही फाटा नजीक पुलानजीक ब्रेकर जवळ ट्रकने दुचाकीला कट मारल्याने दुचाकीस्वार महिलेचा ट्रकच्या चाकात येऊन मृत्यू झाला आहे.
रविवारी सकाळी जयश्री पुंडलिक लिखितकर( वय ६१) या त्यांची मुलगी रोशनी राहुल थोटे व तीन वर्षांची नातीन अयांशी राहुल थोटे यांच्या सह त्यांचे येथील दुचाकी मोपेड क्र. एमएच ४९ सी के ८०२६ याने कुही तालुक्यातील प्रसिद्ध आंभोरा येथे दर्शन करण्यासाठी आले होते. त्यांच्या सोबत दुसऱ्या दुचाकीवर अंशुता गोधडे व पलक कोसे ह्या सुद्धा आल्या होत्या. आंभोरा येथून दर्शन करून पाच जण नागपूर कडे परत जाण्यास निघाले.
दरम्यान चार वाजताच्या सुमारास कुही फाटा पुलाजवळील ब्रेकर जवळ समोरून येणाऱ्या ट्रक क्र. एमएच ४० सिटी १२५९ याने रोशनी धोटे चालवत असलेल्या दुचाकी मोपेड वाहनाला कट मारली. यात दुचाकी मोपेड वाहनवरील रोशनी धोटे, अयांशी धोटे व जयश्री लिखितकर तिघ्याही खाली पडला. यातील जयश्री लिखितकर ( वय६१) यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांच्या डोक्यातून व कानातून रक्त जाऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर रोशनी धोटे व चिमुकली अयांशी धोटे या किरकोळ जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच कुही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून महिलेचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय मेडिकल कॉलेज येथे पाठवण्यात आले आहे.
पोलिसांनी निष्काळजीपणाने ट्रक चालवून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कुहीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप लांजेवार करीत आहेत.





