जि.प. वर्ताळा शाळेत कृतज्ञता सहकार्य सोहळा संपन्न
माजी विद्यार्थ्यांनी दिली शालेय साहित्याची भेट
जि.प. वर्ताळा शाळेत कृतज्ञता सहकार्य सोहळा संपन्न
माजी विद्यार्थ्यांनी दिली शालेय साहित्याची भेट
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड: (दि २): ज्या शाळेतून शिक्षणाचा श्रीगणेशा झाला त्या शाळेप्रती आपुलकी व कृतज्ञता म्हणून जि.प.प्रा.शा.वर्ताळा शाळेतून शिकून गेलेल्या व वेगवेगळ्या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचारी बांधवांनी शाळेला स्मार्ट टीव्ही, सर्व इयत्तांच्या अभ्यासक्रमाचा पेनड्राईव, वाचनासाठी नानाविध पुस्तके, स्वाध्यायपुस्तिका साहित्य भेट दिले.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपलाही विद्यार्थी टिकला पाहिजे या दृष्टिकोनातून गावातील ४४ कर्मचारी बांधवांनी ₹ ४९१५८ निधीचे संकलन केले.यातून वरील साहित्य भेट दिले.यावेळी चंद्रकांत गायकवाड सर,भारत जायेभाये सर,किशन आगलावे सर, बळवंत डावकरे सर, राजेंद्र केरुरे सर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.हणमंत जायेभाये सरांनी स्वाध्यायपुस्तिकांविषयी विस्तृत माहिती दिली.
प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक आचमारे सर,संचलन शिंदे सर यांनी केले.यावेळी गावातील मोतीराम डावकरे,विश्वांभर जायेभाये,आनंद आगलावे,रवी जायेभाये,रमेश डावकरे, भास्कर आगलावे इकबाल शेख अशोक सुर्वे,संतोष जायभाये, धम्मदीप वाघमारे, गणेश जायभाये, किशन आगलावे,ईश्वर आगलावे,पंढरी आगलावे,गणपत गायकवाड,माधव गायकवाड,संदीप गायकवाड यासह शिक्षक आंदुरे सर, विष्णू आगलावे उपस्थित होते.