न्यु मून स्कूलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन
तारका रुखमोडे, जिल्हा प्रतिनिधी
न्यु मून स्कूलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन
तारका रुखमोडे, जिल्हा प्रतिनिधी
गोंदिया/अर्जुनी /मोर: न्यु मून स्कूल येथे २८ नोव्हेंबर रोजी समाजसुधारणेचे प्रणेते आणि शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी उत्साहाने साजरी करण्यात आली.
यावेळी संस्थासचिव ओमप्रकाशसिंह पवार,प्रा.राकेश उंदीरवाडे,प्रा.तारका रुखमोडे, प्रा. सुरज मोटघरे, त्रिवेणी थेर, समस्त शिक्षकवृंद तथा विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. महात्मा फुले यांच्या कार्यावर भाष्य करताना, त्यांच्या स्त्री शिक्षण, दलित उत्थान आणि सामाजिक समतेसाठीच्या योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांचे विचार मांडणारे भाषण आणि कविता सादर करून त्यांना मानवंदना दिली. यासोबतच, शाळेतील शिक्षकांनी “सत्यशोधक समाज” या विषयावर मार्गदर्शन केले आणि महात्मा फुले यांच्या शिकवणींना आपल्या जीवनात कसे लागू करता येईल याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी महात्मा फुले यांच्या आदर्शांचा प्रसार करण्याचा तथा त्यांच्याच स्वप्नाला पुढे नेण्याचा संकल्प केला.