न्यु मून शाळेत भारतीय संविधान दिवस उत्साहात साजरा
तारका रूखमोडे, जिल्हा प्रतिनिधी
न्यु मून शाळेत भारतीय संविधान दिवस उत्साहात साजरा
तारका रूखमोडे, जिल्हा प्रतिनिधी
गोंदिया/अर्जुनी /मोर: स्थानिक न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वपरिश्रमाने लिहिलेल्या जगातील सर्वात मोठे आणि लिखित भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला. तसेच २६ / ११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी प्राचार्य राकेश उंदीरवाडे , पर्यवेक्षिका तारका रुखमोडे, अध्यापिका त्रिवेणी थेर यांनी सविधान स्वीकृतस्वरुपी प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. संविधानातील मूलभूत राजकीय संहिता,संरचना ,कार्यपद्धती,अधिकार,मार्गदर्शक तत्वे, नागरिकांची कर्तव्य व त्यातील अंतर्भूत सर्व कलमे..एकूणच घटनादुरुस्त्या या सर्वांची इत्थंभूत माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या अनुषंगाने शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले. रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत गीत गायन स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच ‘मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतोय’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा असे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. ‘घर घर संविधान’ हा उपक्रम देखील जाणीव जागृतीसाठी राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



