Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनमुंबई

‘आदर्श पतसंस्थे’ची जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर झेप

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 8 4

‘आदर्श पतसंस्थे’ची जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर झेप

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग (प्रतिनिधी): आदर्श नागरी सहकारी पतसंस्था ९३५ कोटी रुपयांचा एकत्रीत व्यवसायाचा पल्ला गाठून रायगड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा गुरुवारी (दि.२) २७ वा वर्धापन दिन आहे. त्यापूर्वीच आदर्शने ९३५ कोटी रुपयांचा एकत्रीत व्यवसायाचा पल्ला गाठून जिल्ह्यात अव्वल क्रमांकावर झेप घेतली. त्या निमित्त बुधवारी (दि. १) आदर्श भवन येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी ही माहिती दिली.

१००० कोटी रुपयांचा एकत्रीत व्यवसाय करण्याचा संकल्प आम्ही मार्च २०२५ मध्येच केला होता. त्यामुळे वातावरण निर्मिती झाली. हे उदिष्ट गाठण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम केले. म्हणून ९३५ कोटींचा पल्ला गाठला. मार्च २०२६ पर्यंत १००० कोटी रुपयांचा एकत्रीत व्यवसायाचा पल्ला आम्ही नक्की गाठू. हे करत असताना कसलीही तडजोड करणार नाही, असे सुरेश पाटील यांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही आर्थिक संस्थेची प्रगती तिच्या ग्राहकांच्या विश्वासावर अवलंबून असते. आदर्श पतसंस्थेने ग्राहकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे . त्यामुळे या पतसंस्थेने रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे. हा प्रथम क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी म्हणाले. दत्ता पाटील क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद पाटील, वात्सल्य ट्रस्टच्या अध्यक्ष सौ. शोभा जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील, उपाध्यक्ष कैलास जगे , संचालक सतीश प्रधान, रामभाऊ गोरीवले, संजय राऊत, एड. वर्षा शेठ, एड. रेश्मा पाटील, विलाप सरतांडेल, डॉ. मकरंद आठवले , एड. आत्माराम काटकर , मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मीनाक्षी पाटील आदी.मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्याधिकारी उमेश पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे