ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध
सत्वपरीक्षा
वृंदा(चित्रा)करमरकर सांगली जिल्हा सांगली
0
4
8
3
0
3
सत्वपरीक्षा
साळसूदांच्या या जगात
गंगाच उलटी वाहते
असत्याची चलती येथे
सत्य मूग गिळून बसते
सत्यालाच पदोपदी इथे
अग्नीपरीक्षा द्यावी लागते
सीतेसारख्या पतिव्रतेची
सत्व परीक्षा घेतली जाते
स्वार्थाच्या या बाजारात
मुखवटेच हो फिरतात
मुखवट्याआडचे चेहरे
कधी कोणाला दिसतात
सत्तेपुढे न चाले शहाणपण
बळी दुबळ्यांचा कान पिळी
तापल्या तव्यावर भाजती पोळी
चोर सोडून संन्याशाला सुळी
बळीराजा शेतात राबतो
घाम गाळून शेत पिकवतो
जगाचा पोशिंदा अर्धपोटी
कोण तयाला न्याय देतो
शिक्षण श्रीमंतांची मक्तेदारी
गरीबांची का वाया हुशारी?
उपाशी राहतो कष्टकरी
खोट्यांची चाले इथे शिरजोरी
वृंदा(चित्रा)करमरकर
सांगली जिल्हा सांगली
=============
0
4
8
3
0
3



