0
4
8
2
9
3
अनोनीत
कितीही लावा जीव, कितीही करा प्रित…
दुर्मुखलेल्या त्या स्थळी,छळ होई अनोनीत…
प्राणाहून प्रिय जरी,मानले अंतकरणी…
लोटांगण घालूनिया,लोळले जरी चरणी…
रूजले ना प्रेमभाव,ना रूजले प्रेमगीत…१
दुर्मुखलेल्या त्या स्थळी,छळ होई अनोनीत…
कुणासाठी किती झटा,खा अनगणित खेटा…
आपले हित सोडूनी, त्यांचेच विचार रेटा…
तुम्हां करणार नाही,कधी ते अधोरेखित…
दुर्मुखलेल्या त्या स्थळी,छळ होई अनोनीत…
स्वार्थासाठी जगणारी, फोफावते ही जमात…
घेतसे साधून स्वार्थ, ठेवून तुम्हां भ्रमात…
त्यांना हवा पैसा फक्त,नको निर्मळ ही प्रित…
दुर्मुखलेल्या त्या स्थळी,छळ होई अनोनीत…
स्वार्थी त्यांचे व्यवहार,स्वार्थी असती आचार…
पैशापुढे बघितले, नित्य होताना लाचार…
“सुधाकरा” दिसे ऐसे,चोहोंदिशा सदोदित…
दुर्मुखलेल्या त्या स्थळी,छळ होई अनोनीत..
सुधाकर भगवान भुरके
आर्य नगर नागपूर
0
4
8
2
9
3



