0
4
8
2
9
7
जिजाऊ हवी होती
सबला झाल्या नारी
जिजाऊ तुम्हामुळे,
भीती,पळाली आमुची
कार्य कर्तृत्वामुळे.
वंदितो माथा आम्ही
नतमस्तक होऊनी,
दुष्ठाचा संहार केलास
हाती तलवार घेऊनी.
तुम्हाला,अपेक्षित असे
निर्भीड आहोत आज,
उदयोग व्यवसाय हीं,
करतोय आम्ही खास.
वैभव पाहण्या,लेकीचे
आज जिजाऊ हवी होती,
थाफ शाबासकीची
पाठीवर हवीशी होती
स्वराज्याचे सुराज्य झाले
वैभव गेलेले दुपट्ट, झाले,
आई असावी तर जिजाऊसारखी
तुझ्याविना,मन हळहळलें.
मायादेवी गायकवाड
मानवत परभणी
0
4
8
2
9
7



