Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितादेश-विदेशनागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

एकांतवास

दत्ता काजळे

0 4 8 3 0 0

एकांतवास

असंगाशी संग नको
भला तो एकांतवास
शांती लाभण्या मनास
हवा संत सहवास ॥

वैफल्याने ग्रस्त झाला
आज घडीला मानव
सुख आहे तयापाशी
परि नाही त्याचा ठाव ॥

सुसंवाद घडविण्या
भासे उणीव तयाला
व्याप आहेत अधिक
वेळ नाही बोलण्याला ॥

नाही सोडण्या तयार
आपलाच अहंभाव
सांगा पाहू समाजात
कसा लागेल निभाव ॥

योगासने,प्राणायाम
मनावर ताबा ठेवी
समाधानी जीवनास
स्वयंशिस्त मात्र हवी ॥

मन गुंतता कर्मात
हवा का एकांतवास
मन:शांती लाभे सदा
प्रियजन सहवास ॥

दत्ता काजळे
जि. धाराशिव

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे