Breaking
आरोग्य व शिक्षणखानदेशदादरा नगर हवेलीदेश-विदेशनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रमुंबई

रितेश सोनवणे’ची उत्तुंग भरारी; JEE परीक्षेत घवघवीत यश

प्रशांत ठाकरे, सिलवासा

0 4 0 9 0 3

रितेश सोनवणे’ची उत्तुंग भरारी; JEE परीक्षेत घवघवीत यश

प्रशांत ठाकरे, सिलवासा

सिलवासा: मराठीचे शिलेदार समूहाच्या ज्येष्ठ कवयित्री सुजाता सोनवणे व सरकारी उच्चतर माध्यमिक विद्यालय सिंदोनी दादरा नगर हवेली शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष सोनवणे यांचे चिरंजीव कुमार रितेश याने JEE परीक्षेत घवघवीत यश संपादन करून उत्तुंग भरारी घेतली आहे.

नुकतीच त्याची एनआयटी गोवा येथे कम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग साठी निवडही झालेली आहे. मुळातच अतिशय अभ्यासू,शिस्तप्रिय व कठोर मेहनत या त्रिसूत्री वर आधारित रितेशने दहावीच्या परीक्षेत ही मोठे यश संपादन केलेले होते. आपल्या यशाची चढती कमान त्याने कायम राखत बारावीच्या परीक्षेतही चांगले यश मिळवलं व सोबत JEE आणि बारावीच्या परीक्षेतल्या घवघवीत यशाने एनआयटी सारख्या नामांकित सरकारी शिक्षण संस्थेत रितेश यास प्रवेश मिळालेला आहे.

रितेशच्या यशात त्याच्या आई-वडिलांचा सिंहाचा वाटा आहे. रितेशचे वडील संतोष सोनवणे हे अतिशय हुशार असून आपल्या शिस्तप्रिय कारभाराबाबत ते दादरा नगर हवेली शिक्षण प्रशासनात लोकप्रिय आहेत .सोबतच आई सुजाता ह्या देखील आदर्श शिक्षिका आहेत व सातत्यपूर्ण लेखन ही त्यांची जमेची बाजू आहे. संपूर्ण कुटुंबाला रितेशच्या या शैक्षणिक सिद्धतेबाबत अभिमान आहे.

नुकताच तो गोवा एनआयटी येथे रवाना झालेला आहे. ‘मराठीचे शिलेदार’ समूहाच्या वतीने रितेशच्या भावी आयुष्यासाठी अनंत कोटी शुभेच्छा व येणाऱ्या काळात तो निश्चितपणे नवं काहीतरी करून दाखवेल याबाबत कुठलीही शंका नाही, असे गौरवोद्गार मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल पाटील सर यांनी काढले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे