Breaking
ई-पेपरकवितापरभणीसाहित्यगंध

तुझेच धम्मचक्र

श्री.संग्राम कुमठेकर,लातूर

0 4 8 2 9 4

तुझेच धम्मचक्र

तुझेच धम्मचक्र रूजवील मानवता
रक्त न सांडताही संपवील दानवता
तथागत गौतमा तू अग्रदूत शांतीचा
बा भीमानं रचीला पाया धम्म क्रांतीचा

पंचशील नी अष्टांग मार्ग हेच मुक्तिमार्ग
धम्मदीप रुजवेल मनात फक्त तो सन्मार्ग
धम्मच विज्ञानवादी,बदलतो चित्र मनाचे
वैचारिक क्रांती घडवून रूप पालटे क्षणाचे

क्षणिक सुखाचा हव्यास आहे आत्मघाती
असत्याची चीड मनात टीका ती घणाघाती
तथागता तुझेच धम्मचक्र बा भीमाने पेलले
फुंकर मारता बाबांनी चवदार तळे तें चेतले

धम्मचक्र परिवर्तन दिनी पाहू भीमाच्या बोटाला
पेन शोभून दिसतो खिश्यात बाबांच्या कोटाला
तुझेच धम्मचक्र प्रकाश वाट दाखवेल जगाला
कोण पाहिलंय सांगा थोतांड नरक- स्वर्गाला?

कोण पाहिलंय सांगा थोतांड नरक- स्वर्गाला?

श्री.संग्राम कुमठेकर,लातूर
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे