Breaking
आरोग्य व शिक्षणकविताक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

आभारीय मनोगत’; डॉ संजय पाचभाई

0 4 8 3 0 0

‘आभारीय मनोगत’; डॉ संजय पाचभाई

माझी ‘लाजलेली फुले’ ही रचना सर्वोत्कृष्ट आली. त्याबद्दल आदरणीय राहुल सर, परीक्षक मंडळ आणि माझे स्नेही यांचे खूप खूप धन्यवाद. बरेच दिवसांनी मनोगत लिहीत आहो.वेळ मिळूनही चालढकल केली किंवा काहीच सुचत नव्हते असे मना. हवेतर पण त्यासाठी माफी मागतो.

रात्रीला मुलीला वीडीओ काल करायला मोबाइल उघडला तर तुमचा फोटो पाठवा असा सरांचा मेसेज दिसला, इतरांप्रमाणे मलाही आनंद झाला. पण त्रिवेणी काव्य की..तेव्हाच फोटो पाठवून दिला, सकाळी नेमकी कोणती रचना असेल ही उत्कंठा लागलेली कारण त्रिवेणी जमत नाही मग मी पाठवलेल्या चार रचना पैकी नेमकी कोणती? शेवटी मधुचंद्रला सर्वोत्कृष्टचा मान मिळाला आणि मी जुन्या आठवणीत गेलो.

34 वर्षा पूर्वीचे सर्व आठवले जी. मायी प्रेमिका आताची मायी ‘एकुलती एक बायको’, गाल पक्के लाल लाल जसे लाली लावत असण असे वाटे. मूण तिच्या गालाले लिचोडा घेतला तं शंभर टक्के ओरीजिनल जी. आता तूमी फालतूचा इचार करत बसू नका बाप्पा बाप्पा संजू दादा किती बुढ़ा असणं. माह्या गोष्टी आयकुन तुमाले वाटते का मी बूड्डा झालो नायीना, माहाबी असाच गोड समज हाहे.
आता लाली गेली तरी खुशहाली टिकून आहे.

क्षणभंगुर सौंदर्याचा
मी का मोह ठेवावा
पलटतात आयुष्याची पाने
त्याचा स्विकार करावा

मणूनसण्या आमी लयी गोडीगूलाबीनं रायतो आता तूमी याले मजबूरी मणा का कायी मणा..

फूल निर्माल्य जरी झाले
ते आठवणीत आहे लपून
कुपी ती अत्तराची आहे
काळजात ठेवली जपून

तुमी बी असेस गोडी गुलाबीनं रावा एवढंच सांगतो, बाकी मले का करा लागते..

‘मृद्गंध’ डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर.
सदस्य, मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे