कविताचंद्रपूरनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
वेदनेचे रंग; प्रतिमा नंदेश्वर

0
4
8
3
0
0
वेदनेचे रंग
तुझ्या आधाराची कुशी
सख्या हवी होती मला,
टाळतच गेलास ना मज
जाणीव नव्हतीच तुला
प्रित घागर रितीच
आयुष्य वळणावर,
आत मुलामा वेदनेचा
हसूच मात्र चेहऱ्यावर
रंगवलेले सुंदर स्वप्न
अधुरेच ते राहिले,
नशीबी वेदनेचे रंग
जगणे रंगहिन झाले
लागेल तुला हुरहुर कधी
भासेल उणीव माझीही,
जागे करतील भावना माझ्या
हळवा होशील तुही
प्रतिमा नंदेश्वर
मूल जि.चंद्रपूर
=======
0
4
8
3
0
0



