
0
5
9
6
9
7
कवितेची वही
मौनातल्या वेदनांनी
घायाळ पुरते केले
सोसवेना सखे विरह
माझे काय चुकले
जीव गुंतवण्यासाठी
रवंथ केला आठवांचा
कवितेची वही चाळता
थांबेना पूर आसवांचा
होतीस जेंव्हा संगतीला
बीज शब्दांकुराचे फुटले
चौफेरला वारु कल्पनांचा
मनाला हर्षाचे भरते आले
ओथंबलेल्या कवीमनाची
आज शब्दगळ झाली
तुजवीण कवितेची वही
सखये अर्धवटच राहिली
कसा देऊ तिला पुर्णत्व
सापडेना मजला उत्तर
शिंपडशील का तू येऊनी
मजवर शब्दगंधाचे अत्तर
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
==========
0
5
9
6
9
7



