बंकिमचंद्र चट्टोपाध्याय पुरस्कार 46 कवी कवयित्रींना प्रदान
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय पुरस्कार 46 कवी कवयित्रींना प्रदान
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी
पुणे: 24 नोव्हेंबर 2025 वंदे मातरम् ही गीत निर्मिती बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी केली, या घटनेस 150 वर्ष पूर्ण झाली यानिमित्त सांजभेट आणि डाॅ.मधुसूदन घाणेकर ब्रह्मध्यान विश्वपीठ संस्थांनी संयुक्तरित्या राष्ट्रहित या विषयावर अखिल भारतीय पातळीवर काव्यलेखन स्पर्धा घेतली, या स्पर्धेस 621 कविता आल्या;त्यातील सर्वोत्कृष्ठ 46 कवी आणि कवयित्रिंना बंकिमचंद्र चट्टोपाध्याय राष्ट्रीय काव्यगौरव पुरस्कार जाहिररित्या प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्कार वितरण संस्थापक, अध्यक्ष आणि पहिल्या विश्वकाव्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सोहळ्याचे संयोजन उपाध्यक्ष प्रिया दामले यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक मंदा नाईक आणि भाजप दिव्यांग सेलचे प्रमुख अंकुश शिर्के प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पुरस्कारार्थींच्या वतीने मनीषा सराफ, समीक्षा चव्हाण, वसुधा नाईक, डाॅ.राजेश्वर हेन्द्रे, शैलजा सोमण, दीपाराणी गोसावी, अंजली महाजन, डाॅ.अपर्णा रायरीकर अनिल कुलकर्णी, डाॅ.प्रविण डुंबरे, निलम शेलटे, महेश कुलकर्णी , श्रीनिवास तेलंग, एम अजया आदि विजेत्यांनी कविता सादर केल्या.
” वंदे मातरम् हे धरणीमातेविषयीचे स्तुतिकाव्य आहे. प्रत्येकाने धरणीमातेची शान वाढवण्यासाठी वसुधैव कुटुंमबकम ह्या उच्च आदर्शवादाचे भान ठेऊन आपल्यातील माणुसपण मोठे करावे “,असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.





