Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

कोथिंबीरसारखी मी

उर्मिला राऊत फ्रेंड्स कॉलनी नागपूर

0 4 8 2 8 6

कोथिंबीरसारखी मी

सकाळी डबा, शाळेची घाई,
संध्याकाळी पुन्हा चूल,
दिवसभर धावूनही थकत नाही,
तरी नाव माझं नाही मूल//१//
घरातही काम बाहेरही जबाबदारी,
माझ्या श्रमांची नोंद कुठे?
हा प्रश्नच उरतो भारी
अपेक्षांचेच ओझे देतात सारी//२//
जेवणात चव देणारी कोथिंबीर मीच,
स्वतःसाठी नसतोच मला वेळ,
कितीही केले तरी पडते मी कमीच,
माझ्या भावनांचा नाही बसत मेळ//३//
घरी दारी सारी नियमांची चाकोरी,
तरी चुकांचे दोष मलाच लावते।
माझं अस्तित्व सगळीकडे लागते,
असल्यास ठीक, नसल्यास लगेच जाणवते//४//
माझी ओळख बनली आहे—
“सगळं सांभाळणारी स्त्री”
पण हे फक्त सोई पुरते,
अन्यथा प्रश्न, तुला काय समजते?//५//
तरीही मी तुटत नाही,
संकटातही उभी राहते धीट,
माझ्या जगण्यालाही अर्थ,
स्वप्नपूर्तीसाठी जीवनघडी बसवते नीट//६//

उर्मिला राऊत
फ्रेंड्स कॉलनी नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे