कधी ते कळलेच नाही
सुधाकर भगवानजी भुरके आर्य नगर, जि.नागपूर

कधी ते कळलेच नाही
हाक मारून थकलोय, पण ते वळलेच नाही
जवळचे ते दूर गेले, कधी ते कळलेच नाही
लावला अतिशय जीव, कुणी कधी केली ना कीव…
जेव्हा तेव्हा कारणे दावी,पळवाटेचे ते भरीव…
बेधुंद धावणारे घोडे, प्रितीत रूळलेच नाही…
जवळचे ते दूर गेले, कधी ते कळलेच नाही
स्वार्थी असे दुनिया सारी,स्वार्थी असती व्यवहार…
खऱ्या प्रेमाच्या अस्तित्वाची, किंमत ठरती भिकार…
जीवापाड प्रित जरी ही, बंधने जुळलेच नाही …
जवळचे ते दूर गेले, कधी ते कळलेच नाही
स्वार्थी ह्या दुनियेमध्ये, दिसेना प्रेम आपुलकी …
सारे येथे स्वार्थ प्रेरीत,वाजवी स्वार्थाची ढोलकी…
आशा केली झाली निराशा,प्रमाण फळलेच नाही…
जवळचे ते दूर गेले, कधी ते कळलेच नाही
नाही साधला मतलब, नाही केलेत करतब…
अर्पित केला देह सारा,पण त्यांची वृत्ती अजब…
आणाभाका किती घातल्या, प्रेम हे फळलेच नाही…
जवळचे ते दूर गेले, कधी ते कळलेच नाही
आता उरल्या रुष्ट आशा, झाल्या मातीमोल अपेक्षा…
संपले सारे जीवलग, आखून दुरत्वाच्या रेखा…
“सुधाकरा” तयांची प्रिती, आत्म्याशी जुळलीच नाही…
जवळचे ते दूर गेले, कधी ते कळलेच नाही
सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर, जि.नागपूर
========



