आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशसाहित्यगंध
भन्नाट रानवारा
संध्या मनोज पाटील अंकलेश्वर (गुजरात)

0
5
4
7
2
3
भन्नाट रानवारा
वसंताने बहरली सृष्टी..
नवपालविने सजली वृक्षवेली..
कोकिळेची कुहुकुहू गाणी..
वेड्या मनाची तार छेडून गेली..
आकाश भावनांचे मनमोकळे खुलले..
पक्षी स्वच्छंदी बागडू लागले…
अनामिक ओढ वाटे या मनाला..
कळेना..काय झोबतंय तनाला…
हवाहवासा का वाटे तो स्पर्श आज..
पानाफुलांवरही चढला गंधित ताज..
नकळत नयनी का अशी आली लाज…
रोमारोमावर सजला अदृश्य साज..
नवा नवा जणू तो सहवास…
वाटे कवेत घ्यावे आज आकाश..
छेडून मला पसार होई तो असा..
करावे तरी कसे स्वाधीन स्वतःस…
हळूहळू त्याचा वेग वाढू लागला..
झाडे वेलींनीही डोलत ताल धरला..
कसे सावरावे मी या तनामनाला..
जरा सुद्धा त्याला धीर ना उरला…
सृष्टीसहित झाला बेहोश मौसम सारा..
कधी नव्हे अशा प्रेमाचा मारा…
करून गेला तो भन्नाट रानवारा…
करून गेला तो भन्नाट रानवारा…!
संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर (गुजरात)
0
5
4
7
2
3



