
0
4
8
2
9
0
आसमंत
आकाश हे निळेसावळे
असे कसे हे मेघाळले
माझिया मनात कसे
स्वप्न भेटीचे सजले
आसमंत हर्ष लेवूनी
भावभरा गहिवरला
तव स्पर्शाच्या आठवे
अंगांगी गंध दरवळला
तुझी याद अनावर
मनी दाटूनिया येता
आठवती तुझ्या माझ्या
ओल्या हळव्या शपथा
चांदणल्या रात्रीसही
आज सुचती उखाणे
सख्या तुझ्या भेटीसाठी
मन जाहले दिवाणे
नेत्रज्योतीने माझिया
तुझ्या वाटेचे औक्षण
गंधाळूदे आता परी
तुझा माझा आता क्षण
वृंदा (चित्रा) करमरकर
जिल्हा सांगली
0
4
8
2
9
0



