नारी कोण तू?
तू राजमाता जिजामाता, स्वराज्याची तू निर्माता
क्रांतीज्योती तू, सावित्री तू,तू शिक्षणाची देवता
तू तळपणारी तलवार, तू रणरागिनी, तू झाशीची राणी
तू ज्ञानदा, तू मिरा, विरहणी तू, तू कृष्णाची राधा
सहचारिणी तू, गजगामीनी तू, स्वराज्याची धुरा औरंग्यास रडवणारी तू तारा
तू रामाची सीता, तू अन्याय साहणारी अहिल्या ,अन्याय संहारक तू द्रोपदी
तू दामिनी ,तू कामिनी, घराची गृहलक्ष्मी तू
सौभाग्याचे कुंकुम तू, मातृत्वाची चाहूल तू, उत्पत्तीचे बीज तू, विश्वाची निर्माती माता तू
तू सहनशीलता ,तू हृदयाची विशालता चमचमणारी सौंदर्याची खाण तू, विश्वाची शान तू
संवेदनशीलतेची गाय तू, संकटावरील कणखर प्रहार तू
नाजूक प्रांजळ सोज्वळ सुकुमार तू, नात्यांचा प्रेमाचा गहिवर तू
दुःख वेदना,व्यथेचा आगार तू, समस्यांचा गाव तू
विद्येची सरस्वती तू, गार्गी मैत्रयीची विद्वत्ता तू, बुद्धीची शारदा तू
मोगरा जाई जुई चा सुगंध तू, प्रेमाचे मूर्तिमंत उदाहरण तू, कवी मनाचे काव्य तू
आदिमाया आदिशक्ती दुर्गा महाकाली तू, दैत्यांचा संहार तू
मातृत्वाचा कळस तू, कडेकपारी बुरुज उतरणारी हिरकणी तू
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ तू, ज्ञानोबांची मुक्ताई तू
पी. टी. उषा सानिया मिर्झा तू, कल्पना चावला सुनीता विल्यम्स अवकाशयात्री तू
ओळख स्वतःला तुझ्यातच लपलेली तू
विश्वाची उद्धारकर्ती, विश्व माता तू, नारी विश्व माता तू
शर्मिला देशमुख -घुमरे
केज रोड,जि.बीड



