ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरदेश-विदेशनागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
समाजव्रत
विष्णू संकपाळ
0
4
8
2
9
0
समाजव्रत
सामाजिक बांधिलकीची
आजकाल घसरलीय प्रत
येथे असा कोणीही नाही
जो चालवेल समाजव्रत… //
इथे सत्वशिल चारित्र्याचे
आज आहेत कितीसे नेते
तत्त्वनिष्ठा जोपासण्याची
सांगा तसदी कोण घेते…?
समाजकारण करता यावे
कधी हा निर्मळ हेतू होता
फक्त यासाठी राजकारण
हा एक प्रभावी सेतू होता.. //
होवून गेलेत आदर्श नेते
शास्त्री, अटलजी, कलाम
समाजव्रतास नेटाने जपले
अशा थोर विभूतींना सलाम… //
सुसंस्कृत राजकारणाचा
आज जपतो कोण वारसा
केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी
नितिमूल्ये झालीत खालसा.. //
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
========
0
4
8
2
9
0



