0
4
8
3
0
0
बाल शिवबा
शिवनेरीवर जिजाऊ पोटी
बाल शिवबा जन्मास आले
शौर्य, धैर्य, अन् पराक्रमाचे
जणू गर्भातच संस्कार झाले… //
जसे बाळाचे पाय पाळण्यात
तसे दिसू लागले स्वभाव धर्म
सुलक्षणे सर्वगुणसंपन्न खास
वर्तन आचरण राजस कर्म.. //
बाल गोपाल सारे सवंगडी
मिळून मांडती साजेसे खेळ
लटकीच शस्त्रे, भाले, बरचे
नाना युक्ती प्रयुक्तीचा मेळ… //
वय वर्ष अवघे होते सोळा
स्वराज्याचे बांधले तोरण
मुत्सद्दी करारी जिजाऊंनी
महाराष्ट्राचे आखले धोरण…//
सह्याद्रीच्या कडे कपारीत
घुमली बालसिंहाची गर्जना
“पुरे हिंदूस्थान की हुकमत”
हवेत विरली बादशाही वल्गना.. //
विष्णू संकपाळ बजाजनगर
जि छ. संभाजीनगर
0
4
8
3
0
0



