Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनागपूरविदर्भ

डॉ. संपदा मुंढे यांच्या न्यायासाठी दक्षिण नागपूरमध्ये कॅण्डल मार्च यशस्वी

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

0 4 8 2 9 7

डॉ. संपदा मुंढे यांच्या न्यायासाठी दक्षिण नागपूरमध्ये कॅण्डल मार्च यशस्वी

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

नागपूर (दि २): फलटन उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंढे यांच्या आत्महत्येला न्याय मिळावा या मागणीसाठी आयोजित “नागपूर कॅण्डल मार्च” हा उपक्रम आज नागपूरमध्ये अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध आणि प्रभावीपणे पार पडला.

मंगलमूर्ती चौक ते तिरंगा चौक असा मार्ग असलेल्या या कॅण्डल मार्चमध्ये शेकडो नागरिक, सामाजिक संस्था, महिला संघटना, विद्यार्थी, डॉक्टर, समाजसेवक आणि स्थानिक रहिवासी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
संपूर्ण परिसर “डॉ. संपदा मुंढे यांना न्याय मिळालाच पाहिजे!” या घोषणांनी दुमदुमून गेला.

मार्चदरम्यान सहभागी नागरिकांनी डॉक्टरांवरील वाढत्या ताणतणाव, राजकीय दबाव आणि व्यवस्थेतील अन्याय यावर तीव्र संताप व्यक्त केला.
तसेच सरकारकडे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन समाजसेविका रोमा चिराग चौधरी आणि पूजा मानमोडे सोबत विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने करण्यात आले.

कॅण्डल मार्चच्या शेवटी तिरंगा चौक येथे मौन पाळून डॉ. मुंढे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सांगितले की, “ही लढाई फक्त डॉ. संपदा मुंढे यांच्यासाठी नाही, तर प्रत्येक प्रामाणिक, मेहनती आणि न्यायप्रिय डॉक्टरसाठी आहे. न्याय मिळेपर्यंत ही लढाई सुरूच राहील.”

या निमित्याने दक्षिण नागपूर चे समाजसेवक गिरीश पांडव आणि परमेश्वर राऊत, अजय वानखेडे, निलेश खोरगडे,नितीन रामटेककर, सारिका दुपारे, पूजा मानमोडे, अनुष्का वानखेडे, महेश बांते, राजू काळे, अविनाश वराडे, अक्षय हेटे, रौनक चौधरी, सुशांत लोखंडे, राहुल अभंग,प्रणय सिंह ठाकूर, राजू मोहोड,ऋतिक राऊत, चिराग चौधरी इत्यादी उपस्थित होते सोबतच बेटिया शक्ती फाउंडेशन आणि स्त्री नमन फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे