बाबासाहेब नाजरे हायस्कूल व जुनियर कॉलेज, आवास मध्ये गाणितोत्सव उत्साहात संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व जुनियर कॉलेज, आवास मध्ये गाणितोत्सव उत्साहात संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी
अलिबाग: (दि २३)भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुज यांचा जन्मदिन प्रत्येक वर्षी २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो.
आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवास मध्ये शासनाच्या परीपत्रकानुसार मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या सुनियोजनातून व मार्गदर्शनातून तसेच सर्व शिक्षकाच्या, सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून आणि सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागातून रविवार दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणितोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी विद्यार्थ्यांना भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुज यांची महती सांगितली. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाची गोडी निर्माण व्हावी तसेच विद्यार्थ्यांना व्यवहारिक गणित, गणितीय तर्क करणे, संख्यज्ञान, गणितीय मर्मदृष्टी इत्यादींचा विकास व्हावा या उद्देशाने गणिती कोडी, गणित विषयक खेळ अशा प्रकारचे विविध उपक्रम विविध शैक्षणिक साहित्यांचा वापर करून राबविण्यात आले.
याप्रसंगी गणित शिक्षक सचिन भंडारे सर, सुनील मोरे सर, अजित नाईक सर, दिलीप चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने उपक्रमात सहभागी झाले होते. हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती करता खूपच उपयुक्त ठरणार आहेत.