आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनचंद्रपूरविदर्भसाहित्यगंध
फेरीवाला
प्रतिमा नंदेश्वर ता. मूल, जि.चंद्रपूर

0
4
8
2
8
4
फेरीवाला
आला आला तो फेरीवाला
रंगीबेरंगी फुगे घेऊन आला
सारी मुले झाली त्याच्याभोवती
गोळा,सगळे फुगे तो विकून गेला
आला आला पुन्हा फेरीवाला
चाॅकलेट,बिस्किटे घेऊन आला
आवडता खाऊ साऱ्या मुलांचा
सगळ्या मुलांनी पटकन घेतला
फेरीवाला आमच्या दारात आला
विविध खेळणी आज घेऊन आला
पिंटू, मिनी,राणी,राजूने खरेदी केली
खेळणी घेताच सर्वांना आनंद झाला
खेळण्याच्या नादात शाळेत जाईना
कमालच केली आज फेरीवाल्यान
सारे सवंगडी धावत त्याच्याकडे येत
भूलली मुले सारी त्याच्या गोड बोलण्यान
अनवाणी फिरायचा फेरीवाला
पोटासाठी तो रोज फेरी मारायचा
आपण कष्ट करून दिवसभर
कुटुंबाला तो सुखात ठेवायचा
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल, जि.चंद्रपूर
0
4
8
2
8
4



