Breaking
कवितामराठवाडासाहित्यगंध

आस पावसाची

अस्मिता हत्तीअंबिरे जि.परभणी

0 4 8 2 9 7

आस पावसाची

तळपती धरणी होई लाही लाही
आस पावसाची कोसळ रे दिशा दाही..

बळी राजाला प्रतीक्षा तुझ्या आगमनाची
झाली लगीनघाई सुरू ही पेरणीची…

तुझ्या मिलनासाठी आतुरली धरा
तसदी घे ना तू जलदी येण्याची जरा…

होतो जीव कासावीस गुदमरतो
आतुराला जीव वाट तुझी पाहतो….

नदी नाले झाले सगळी कोरडे ठाक
येण्याची तू कर घाई ऐक जरा अंतरीची हाक….

तडपतील रे जीव सारे
विलंबाने तू बरसशील उष्णतेचे वाहतील वारे….

कडी, कपारी, डोंगर दरी
आस पावसाची ओसंडून वाहतील सारी…

अस्मिता हत्तीअंबिरे
जि.परभणी
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे