आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध
स्वागत नववर्षाचे
पुरुषोत्तम ठोंबरे झिंगाबाई टाकळी नागपूर

0
5
1
6
4
1
स्वागत नववर्षाचे
मराठमोळे नववर्ष
मनी अमुच्या झाला हर्ष
चैत्र महिना शुक्ल पक्ष
गुढी उभारू नववर्षाची
दारावरती बांधू तोरण
अंगणी रांगोळ्याच लेखन
विजयाची उंच गुढी उभारून
करू या तीचे आपण औक्षण
तरुवर फुलली नवी पालवी
चंद्र नभीचा प्रकाश फुलवी
रविकिरणही सोनेरी पडले
चैतन्याने मनही फुलले
नववर्षात नवी उमेद स्मरू या
नव आशा नव संकल्प करू या
ह्रदयी आपण होऊ हर्षित
नवविचाराचे करू या स्वागत
प्रभू चरणी करू प्रार्थना
सुख सम्रृधदीचे जावो वर्ष
श्रमाचे बीज पेरूनी
नववर्षात फुलवू हर्ष
पुरुषोत्तम ठोंबरे
झिंगाबाई टाकळी नागपूर
0
5
1
6
4
1



