
0
6
5
6
0
4
लाडकी आजी
माझी लाडकी आजी
माझ्यावर खूप प्रेम करते
माझी रोज काळजी घेते
मला ती खूप आवडते
चालायला तिच शिकवते
पडले तर लगेच उचलते
किती तिच्या मनात जिव्हाळा
नातीसाठी जीव ओवाळते
पर्यांची, राजाची, हत्तीची
सुंदर सुंदर गोष्टी सांगते
जवळ घेऊन अंगाई गीत गाते
तिच्या कुशीत मायेची उब मिळते
माझी आजी सोन्यासारखी
तिच्या प्रेमाला नाही हो तोड
दिवस तिचा कामात जातो
जरी थकली तरी हसते गोड
छान माझी लाडकी आजी
देवापेक्षाही मायाळू आहे
आईचे रूप दिसते तिच्यात
तिच्या मुळेच घर जोडून आहे
प्रतिमा नंदेश्वर
मूल, जि.चंद्रपूर
========
0
6
5
6
0
4



