0
4
8
2
9
3
लोपला ज्ञानसूर्य
जरी लोपला ज्ञानसूर्य
हृदयात कोरलीय मूर्ती
दूरदृष्टीचे बा क्रांतीकार्य
सदैव देते आम्हा स्फुर्ती
ज्ञानाच्या महासागरास
अभिवादन करू या गडे
माणूस बनवून आम्हांस
संविधानरूपी दिले कडे
सुरक्षाकडे हे तोडण्याची
जे करतील आता हिंमत
तमा नाही रे जगण्याची
चुकवावी लागेल रे किंमत
ज्ञानसूर्य बा भीमरायाने
दिलंय माणूसपण शाश्वत
गर्विष्ठ बनू नका कमाईने
अद्वितीय त्यागमूर्ती विश्वात
जरी लोपला ज्ञानसूर्य
विचारांचा चालवू वारसा
निःस्वार्थ करू सत्कार्य
दाखवू जगी भीमआरसा
संग्राम कुमठेकर
जि लातूर
0
4
8
2
9
3



